बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (15:21 IST)

पाकिस्तानी नौदलाकडून गुजरात किनाऱ्यावर गोळीबारात एका मच्छिमाराचा निर्घृण खून

पाकिस्तानच्या नौदलाने गुजरातच्या किनाऱ्यावर गोळीबार केला. या गोळीबारात एक मच्छिमाराला ठार मारण्याचे वृत्त मिळाले आहे. हा गोळीबार गुजरातच्या द्वारका येथील ओखा शहराजवळ 'जलपरी' नावाच्या बोटीवर पाकिस्तानच्या नौदलाने केला होता. या गोळीबारात श्रीधर नावाचा निर्दोष मच्छेमार ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. अद्याप या संदर्भात एवढीच माहिती मिळाली आहे. या पूर्वी देखील पाकिस्तानच्या नौदलाने 11भारतीय मच्छेमारांना अटक केली होती आणि त्यांच्या दोन बोटी जप्त केल्या होत्या. तर आज पाकिस्तानच्या नौदलाने गोळीबार करून एका मच्छीमाराला ठार मारल्याचे वृत्त मिळाले आहे.