पीएम मोदींनी ताफा थांबवून रुग्णवाहिकेला मार्ग दिला
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील चंबी येथे निवडणूक रॅलीसाठी जात असताना त्यांनी ताफ्याला थांबवले आणि रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता दिला. रुग्णाच्या जीवाला धोका होता कामा नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदनशीलता दाखवली. रुग्णाला रुग्णालयात पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे, याची काळजी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली.
त्यामुळे त्यांनी ताफ्याला थांबण्याचा आदेश दिला आणि रुग्णवाहिकेला रस्ता दिला. पीएम मोदींच्या रॅलीमुळे सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या होत्या. पीएम मोदींचा ताफा ज्या रस्त्यावरून गेला त्या रस्त्यावरून वाहतूक वळवून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
Edited by - Priya Dixit