सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (18:29 IST)

देश मनमोहन सिंहांचा कायम ऋणी राहील- नितीन गडकरी

nitin
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची स्तुती केली आहे आणि म्हणाले की देशाच्या प्रगतीसाठी देश त्यांचा कायमच ऋणी राहील.
 
केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी मंगळवारी दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या TIOL पुरस्कार 2022 सोहळ्यात ते बोलत होते.
 
त्यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की भारताला एक उदार आर्थिक धोरणाची गरज आहे ज्यामुळे गरिबांना कल्याण होईल.
 
1991 मध्ये अर्थमंत्री असताना मनमोहन सिंह यांनी केलेल्या आर्थिक सुधारांमुळे देशाला एक नवी दिशा मिळाली अशी बातमी PTI या वृत्तसंस्थेने दिली आहे.
 
काय म्हणाले गडकरी?
नितीन गडकरी म्हणाले, “खुल्या अर्थव्यवस्थेमुळे देशाला एक नवी दिशा मिळाली त्यासाठी देश मनमोहन सिंहांचा देश कायमच ऋणी राहील.”
 
खुली अर्थव्यवस्था शेतकरी आणि गरिबांसाठी आहे याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
 
यावेळी गडकरी यांनी नव्वदच्या दशकात रस्ते निर्माण करण्यासाठी निधी उभारण्यात ज्या अडचणी आल्या त्याचाही उल्लेख केला. त्यावेळी गडकरी महाराष्ट्रात मंत्री होते.
 
मनमोहन सिंह यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे त्यांना रस्ते बांधणीसाठी निधी मिळाला होता.
 
TaxIndia Online या पोर्टल ने हा पुरस्कार समारंभात ते बोलत होते.
 
खुल्या अर्थव्यवस्थेमुळे देशाच्या विकासासाठी किती फायदेशीर होतं हे समजून घेण्यासाठी चीन हे उत्तम उदाहरण आहे, असं गडकरी यावेळी म्हणाले
 
नितीन गडकरी यांच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय प्रतिक्रिया देतील काय माहिती अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रणंजॉय गुहा-ठाकुरता यांनी दिली आहे.
 
नितीन गडकरी यांच्या ताज्या वक्तव्यावर भाजप काय प्रतिक्रिया देते हे आता येणारा काळ ठरवलेच. मात्र पक्षाला न आवडणारी अनेक वक्तव्यं त्यांनी याआधीही केली आहेत आणि भाजप त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा अडचणीत आलं आहे.
 
संसदीय समितीच्याही बाहेर
गडकरी एकेकाळी भाजपचे अध्यक्ष होते. ते स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. ते भाजपचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत.
 
यावर्षी भाजपने त्यांना संसदीय समिती आणि केंद्रीय निवडणूक समितीतून बाहेर काढलं होतं. नको ते आणि नको त्या वेळी वक्तव्यं केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.
 
यावर्षी नितीन गडकरी नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले, “महात्मा गांधी यांच्यावेळी राजकारण, देश, समाज, विकासासाठी होत होतं. आता राजकारण फक्त सत्तेसाठी होतं. कधी कधी राजकारण सोडण्याची इच्छा होते." असं म्हटल्यावर काही काळानेच त्यांना महत्त्वाच्या पदांवरून हटवलं होतं.
 
आपल्याच सरकारविरुद्ध बोलतात गडकरी
गेल्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात गडकरी भारत विकास परिषदेला संबोधित करताना म्हणाले की भारत ही जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उभारली आहे मात्र भारतातले लोक अजूनही गरीब आहेत.
 
हे वक्तव्य म्हणजे मोदींवर टीका आहे, असं मानलं गेलं.
 
"श्रीमंत आणि गरीबांमधली दरी दिवसेंदिवस वाढत आहे.  भारतातील लोक उपासमार, बेरोजगारी, जातीयवाद, अस्पृश्यता आणि वाढत्या महागाईला तोंड देत आहेत. हे सगळं कमी करण्यासाठी एक सेतू तयार करण्याची गरज आहे," असंही गडकरी म्हणाले होते.
 
त्याआधी गडकरी म्हणाले होते की सरकारमध्ये वेळेवर निर्णय घेतले जात नाहीत.
 
ते म्हणाले होते, “कोणत्याही प्रकारच्या निर्माण कार्यात वेळेचं महत्त्व मोठं आहे. सरकामध्ये वेळेवर निर्णय घेतले जात नाही ही एक खूप मोठी समस्या आहे.”
 
भाजप नेहमीट आणीबाणीच्या निर्णयावरून इंदिरा गांधींवर टीका करत असतो. मात्र 2019 मध्ये नागपूरमध्ये एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी इंदिरा गांधींची स्तुती केली होती.
 
तेव्हा पुरुषसत्ताक असलेल्या काँग्रेस पक्षात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या इंदिरा गांधींचं त्यांनी कौतुक केलं होतं.
 
2018 मध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरावर होता. तेव्हा देशात नोकऱ्याच नाही तर आरक्षण देऊन काय फायदा असं वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवली होती.
 
 Published by - Priya Dixit