शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2017 (17:23 IST)

राष्ट्रपती निवडणूक : जेडीयूचा रामनाथ कोविंद यांना पाठिंबा

विरोधी पक्षांतील महत्वाचा पक्ष जेडीयूने (जनता दल युनायटेड) एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांना रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. पाटणामध्ये  जेडीयूच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये रामनाथ कोविंद यांच्या नावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नितीश कुमार यांनी एनडीएला पाठिंबा दिल्याने अनेक राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत. या घोषणेसोबतच नितीश कुमार यांनी बिहारमधील महायुतीतील घटक पक्ष आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. या  निर्णयाने मोदींविरोधात एकवटत असलेल्या विरोधकांची हवा काढली आहे.