1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:29 IST)

सासूने सुनेला केली मदत, मिळवून दिली 4 कोटींची पोटगी

मुलगा आणि सून घटस्फोटानंतर वेगळे झाल्यावर मुलाकडून सुनेला 4 कोटींची पोटगी मिळवून देण्यासाठी एकाने सासूने तिच्या सुनेला मदत केली आहे. घटस्फोटानंतर सुनेला तिचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करता यावा त्यासाठी या महिलेने तिच्या सुनेला पाठिंबा दिला. कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणी देवानंद शिवशंकरप्पा काशप्पनावर यांना 60 दिवसांच्या आतमध्ये त्यांच्या पत्नीला 4 कोटी रूपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. देवानंद शिवशंकरप्पा कर्नाटकचे माजी दिवंगत मंत्री एस.एस. काशप्पनावर यांचा मुलगा आहे.

कौटुंबिक न्यायालयाने 24 जुलै रोजी हा निर्णय दिला. या प्रकरणातील  विशेष बाब म्हणजे कोर्टात देवानंद यांच्या आईने सुनेच्या बाजूने साक्ष दिली. या प्रकरणातील सुनेने 2015मध्ये  पतीपासून वेगळं होण्यासाठी आणि 4.85 कोटी रूपये पोटगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती. या मागणीला कोर्टाने मंजुरी दिली आहे.