सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (08:52 IST)

त्या रुग्णांची RT-PCR स्वॅब चाचणी आता बंधनकारक

अँटीजेन चाचणी नकारात्मक आली असली तरीही, कोविड सदृश लक्षण असलेल्या रुग्णांची RT-PCR स्वॅब चाचणी करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्र सरकारानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.
 
कोविडची बाधा झालेला कोणीही रुग्ण सुटू नये आणि त्याच्यापासून पुढे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येणार आहे. अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी खास नियुक्त अधिकाऱ्याच्या गटामार्फत यंत्रणा उभारण्याची गरजही केंद्रानं व्यक्त केलीय.
 
हा गट दैनंदिन जलदगती अँटीजेन चाचण्यांच्या अहवालाचं जिल्हा तसंच राज्यस्तरीय विश्लेषण करून नकारात्मक अहवाल असूनही लक्षणं असलेल्या रुग्णांच्या पुनर्चाचणी संबंधी कार्यवाही करेल. देशात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे.