सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (08:10 IST)

‘मी दलित, माझे पूर्वज हिंदू, मग मुलगा मुसलमान कसा झाला’; समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या धर्माबाबत सुरू असलेल्या चर्चेवर वडील ज्ञानदेव वानखेडे  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी त्यांनी म्हटले की, आमचे पूर्वज हिंदू होते, मग मुलगा मुसलमान कसा असू शकतो.
सोमवारी सुद्धा त्यांनी आपल्या नावाबाबत स्पष्टीकरण दिले होते आणि म्हटले होते की, त्यांचे नाव ‘दाऊद’ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी दावा केला होता की, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे खरे नाव ‘समीर दाऊद वानखेडे’  आहे.
 
बनावट प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप
वृत्तसंस्था एएनआयसोबत बोलताना समीर वानखेडेयांच्या वडीलांनी म्हटले होते की, मी स्वता दलित आहे. आम्ही सर्व आहोत. माझे आजोबा-पणजोबा हिंदू होते. माझा मुलगा मुसलमान कसा असू शकतो. त्यांना (नवाब मलिक) हे समजले पाहिजे.
 
एनसीपी नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे, त्यांनी दावा केला आहे की, जर ते चुकीचे ठरले तर राजकारण सोडून देतील.
काय म्हणाले समीर वानखेडे
पत्रकारांसोबत बोलताना एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी म्हटले की, मी जन्माने हिंदू आहे आणि दलित कुटुंबातून आलो आहे. मी आजही हिंदू आहे. मी कधीही कोणत्याही धर्मांतरातून गेलेलो नाही.
 
भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि मला याचा अभिमान आहे. त्यांनी म्हटले, माझे वडील हिंदू आहेत आणि माझी आई मुस्लिम होती. मी दोघांवर प्रेम करतो. माझ्या आईची इच्छा होती की मी विवाहात मुस्लिम रितीरिवाजांचे पालन करावे. त्याच महिन्यात माझा विवाह स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट अंतर्गत रजिस्टर झाला, कारण जेव्हा दोन वेगवेगळ्या धर्माचे लोक विवाह करतात तेव्हा हा विवाह या कायद्यांतर्गत नोंदला जातो.
त्यांनी पुढे म्हटले की, नंतर आमचा कायदेशीर तलाक झाला.जर मी कोणता दुसरा धर्म स्वीकारला असेल तर नवाब मलिक यांनी सर्टिफिकेट दाखवावे.माझे वडील स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट अंतर्गत सर्टिफिकेट दाखवतील.