शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 15 डिसेंबर 2021 (20:17 IST)

रेल्वेत वरच्या बर्थवरून पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

ट्रेनमध्ये प्रवास करत असताना रेल्वेच्या वरच्या बर्थवरून पडून 72 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही एक्सप्रेस ट्रेन चेन्नईला जात होती. ही घटना रविवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. तांबरम स्थानकाजवळ एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यक्तीचा चष्मा तुटलेला आढळून आला असून रेल्वेच्या डब्यात रक्त सांडलेले होते. 
नारायण असे या मृत व्यक्ती चे नाव आहे. नारायण हे कराईकुडी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, नारायण 20 लोकांच्या गटाचा एक भाग होते जे केरळमधील वडकारा येथील मंदिराला भेट देण्यासाठी जात होते. हे लोक आधी चेन्नईतील एका मंदिरात जातील, अशी योजना या लोकांनी आखली होती.
 
हा गट  सिलांभू एक्स्प्रेसच्या एस 2 डब्यात बसला होता. शनिवारी ग्रुपमधील सर्व सदस्य ट्रेनमध्ये चढले होते. या सर्व लोकांना सेंगोताईहून चेन्नईला जायचे होते. वरच्या बर्थवर नारायण बसले होते. नारायण हे ट्रेनमध्ये आपल्या सीटवर झोपले होते आणि त्यानंतर अचानक ते वरून खाली पडले, असे सांगण्यात येत आहे. मात्र ग्रुपमधील इतर सदस्यांना ते लगेच खाली पडताना दिसले नाही. 
सुमारे 10 मिनिटांनंतर काही लोकांनी त्यांनी खाली पडताना पाहिले. त्यांच्या कानातून रक्त वाहत होते. सहप्रवाशांनी त्यांची मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते  बेशुद्ध होते. यानंतर तांबरम स्थानकावर प्रशासनाला सतर्क करण्यात आले. रेल्वेत उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी नारायणची तपासणी केल्यानंतर त्यांना  मृत घोषित केले. याप्रकरणी तांबरम जीआरपीने प्रकरण नोंदवले असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे.