बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मनालीमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस, 9 महिलांसह 11 जणांना अटक

पर्यटनासाठी प्रसिद्ध मनाली येथे सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांनी नऊ महिला आणि मुलींसह 11 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन एजंट सामील आहेत. 
 
गेल्या अनेक दिवसांपासून येथे सेक्स रॅकेट असून कोणालाही या बद्दल माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक महिलांना याबद्दल कळल्यावर त्यांनी याविरुद्ध आवाज काढली कारण एवढ्या सुंदर पर्यटन स्थळाची अशी इमेज त्यांना मान्य नव्हती. 
 
महिलांनीच मनालीच्या एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हे रॅकेट उघडकीस आणले आणि एजंट्सला देखील धरवण्यात मदत केली. त्या प्रशासन आणि हॉटेल व्यवसायींसोबत बैठक करून स्वत: बाहेर पडल्या. 
 
महिलांना या बद्दल कळल्यावर त्यांनी लगेच पोलिसांना सूचित केले. मनालीमध्ये काही दिवसांपासून मुली खुलेआम असे प्रकरण हाताळत होत्या. रॅकेटमध्ये सामील मुली पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
यात अजून लोकं सामील असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिस प्रकरणाची चौकशी करत आहे आणि सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्याची तयारी आहे.