रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2017 (11:25 IST)

शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातलं शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या वेदनेतून उभं राहिलं आहे. त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही, असं शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. तसंच शेतकरी आंदोलनात पोलीस बळाचा वापर केला जातोय, हे किती योग्य आहे? असाही प्रश्न शरद पवार यांनी मोदी यांना विचारला आहे. आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे तातडीनं मागे घ्यावेत अशीही मागणी शरद पवारांनी केली आहे.