रविवार, 11 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जून 2018 (09:03 IST)

'रायझिंग काश्मीर'च्या संपादकांचीही हत्या

shujit bukhari
ज्येष्ठ पत्रकार आणि 'रायझिंग काश्मिर'चे संपादक शुजात बुखारी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. श्रीनगरमधील वृत्तपत्र कार्यालयाबाहेर अज्ञात बंदुकधाऱ्यांनी बुखारींवर गोळीबार केला. इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बुखारी हे लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्हमध्ये असलेल्या कार्यालयातून निघाले होते. बुखारी गाडीत बसताना काही जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
 
यामध्ये शुजात बुखारी यांच्यासह त्यांचा पीएसओ (वैयक्तिक सुरक्षा अधिकारी) मृत्युमुखी पडला, तर एक पोलिस आणि सामान्य नागरिक जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.