रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 जून 2022 (20:20 IST)

फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा संशयास्पद मृत्यू, घरातून मृतदेह आढळला

Banjara Hills
प्रफोटो साभार -सोशल मीडिया प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. बंजारा हिल्स येथील राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळली. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी माहिती दिली आहे की, डिझायनरच्या बेडरूममधून कार्बन मोनोऑक्साइड देखील जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयास्पद मृत्यू कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
 
तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युषाच्या बेडरूममधून कार्बन मोनोऑक्साइडचा सिलेंडर जप्त करण्यात आला आहे. सध्या मृत प्रत्युषाचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.