शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मार्च 2019 (17:30 IST)

सीए परीक्षेची तारीख पुढे सरकली, 27 मे ते 12 जून दरम्यान होणार

आगामी लोकसभा निवडणुकांमुळे चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या परीक्षांची तारीख पुढे सरकवण्यात आली आहे. आता ही परीक्षा 27 मे ते 12 जून दरम्यान होणार आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (आयसीएआय) ने ही माहिती सोमवारी दिली.

आयसीएआयने असे सांगितले की एप्रिल-मे मध्ये होणार्या 17व्या लोकसभा निवडणुकीमुळे 2 आणि 17 मे दरम्यान होणार्या या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षांना सध्या स्थगित केले गेले आहे. ही परीक्षा आता 27 मेपासून 12 जून 2019 पर्यंत होणार आहे.
 
हे उल्लेखनीय आहे की निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. यावेळी 7 टप्प्यात निवडणुका होणार आहे. 11 एप्रिलला प्रथम चरण मतदान आणि अंतिम फेरी मतदान 19 मे रोजी होणार आहे. मते मोजणी 23 मे रोजी होणार आहे.