1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (13:50 IST)

मुली समोरच बापाला मारहाण केली

The father was beaten in front of the girls national News In Marthi Webdunia Marathi
कानपूर पोलिसांनी एका मुस्लिम ई-रिक्षाचालकाला मारहाण केल्याबद्दल आणि "जय श्री राम" च्या घोषणा दिल्याच्या आरोपाखाली तीन जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही लोक भगवा गमछा घातले आहेत. एका 45 वर्षीय मुस्लिम व्यक्ती अफसार अहमदला मारहाण करताना दिसत आहे मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, 
 
या मध्ये  काही लोक एका मुस्लीम माणसाला बळ जबरी "जय श्री राम" च्या घोषणा लावण्याचे दिसत आहेत, त्या माणसाला 5- वर्षाची त्याची मुलगी सोडविण्यासाठी त्यांच्या गयावया करताना दिसत आहे. त्या व्यक्तीला मारहाण करून घोषणाबाजी केल्याची कथित घटना बुधवारी घडली आहे. तीन आरोपींना अटक करण्याचे कानपूरच्या डीएसपी (दक्षिण) रवीना त्यागी यांनी माध्यमांना सांगितले की, ही घटना बुधवारी बर्रा भागात घडली. कानपूर शहर पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी सांगितले की, या प्रकरणात तीन आरोपी अजय उर्फ ​​राजेश बँडवाला, अमन गुप्ता आणि राहुल कुमार यांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
 
एका वृत्तपत्राने आपल्या अहवालात लिहिले आहे की, बजरंग दलाच्या अनेक कार्यकर्त्यांनी तिघांच्या अटकेविरोधात गुरुवारी रात्री कानपूर येथील डीसीपी (दक्षिण) कार्यालयाबाहेर निदर्शने केली. 
 
काय आहे संपूर्ण प्रकरण 
प्रत्यक्षात बुधवारची घटना एका महिन्याच्या जुन्या घटनेशी संबंधित आहे. वृत्तानुसार, कानपूरच्या बर्रा भागातील एका कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीची काही तरुणांनी छेडछाड केल्याचा आरोप आहे. हिंदू कुटुंबाने आरोप केला की छेडछाड करणाऱ्यांनी त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. 
 
पोलिसांचे म्हणणे आहे की हा वाद नंतर जबरदस्तीने धर्मांतराच्या आरोपाकडे वळला. अफसार अहमद हा आरोपीचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. बुधवारी हिंदू संघटनेशी संबंधित काही लोक विनयभंगाच्या आरोपीच्या घरी पोहोचले होते, पण जेव्हा आरोपी त्यांना सापडला नाहीत, तेव्हा त्यांनी अफसार अहमद ला मारहाण करण्यास सुरुवात केली.एसीपी (गोविंदनगर) यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, "हिंदू संघटनेचे काही लोक वादात अडकलेल्या एका कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते, त्यांच्या वतीने कारवाईची मागणी केली. ते तेथे असताना काही स्थानिक रहिवाशांनी दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांना पकडून मारहाण करण्यात आली. त्याला पोलिसांकडे नेण्यात आले आणि तो आता बरा आहे. " कानपूर प्रशासनाने बर्रा परिसरातील परिस्थिती पाहता पोलिस तैनात केले आहेत. अहमदने आपल्या तक्रारीत पाच जणांची नावे दिली आहेत, तर 10 अज्ञात आहेत. मुस्लिम व्यक्तीला झालेल्या मारहाणीवर राजकीय पक्षांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली