शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2017 (11:37 IST)

Crime : चिडलेल्या प्रेयसीने अॅसिड फेकले जाळले प्रियकराला

मुलींवर नेहमी काही कारणांनी मातेफिरू अॅसिड फेकतात अश्याच घटना समोर आल्या आहेत, मात्र मुंबईत वेगळीच घटना घडली आहे. चक्क एका मुलीने रागाच्या भरात प्रियकरावर अॅसिड हल्ला केला आहे. यामध्ये प्रियकराने प्रेम आणि  लग्नाला नकार दिला म्हणून  संध्याकाळी मुंबईच्या गोरेगावमध्ये अॅसिड फेकल्याची  घटना घडली. प्रियकर बोलायचा बंद झाला म्हणून संतापलेल्या प्रेयसीने प्रियकरावर अॅसिड फेकले. या हल्ल्यात प्रियकर ओमसिंग सोलंकी गंभीर जखमी झाला असून त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे. एका वादातून ओमसिंगने प्रेयसीशी बोलणे बंद केले होते. तरुणीने ओमसिंगची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे बाटलीत आणलेले  अॅसिड त्याच्या चेहरयावर फेकले आणि तेथून पळ काढला आहे.