बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (15:33 IST)

'या' अधिकाऱ्याचा थेट भाजपशी संबंध, नवाब मलिक यांनी दाखविले फोटो

नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोने कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करत ड्रग्ज जप्त केले आहेत. यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यन खानला अटक करणारा एनसीबीचा अधिकारी आणि अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी हे भाजपशी संबंधित असल्याचे आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी फोटोसह अधिकाऱ्यांचा भाजपशी संबंध असल्याचे दाखवले आहे. अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी मनीष मर्चंट हा एनसीबीचा अधिकारी नसून भाजपचा नेता असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. भानूशालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे फोटो देखील नवाब मलिक यांनी दाखवले आहेत.
 
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री यांनी एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे.  बॉलीवूड इडस्ट्रीला बदनाम करण्यात येत आहे. मलिक यांनी म्हटलं आहे की, ३ ऑक्टोबरच्या रात्री आम्ही टीव्हीवर बातम्या बघितल्या की, क्रूझवर एनसीबीने रेड केली. यानंतर चर्चा सुरु झाली. एका अभिनेत्याच्या मुलाला अटक करण्यात आली. सर्व माध्यमांनी या बातम्या दाखवल्या, एएनआयने काही व्हिडिओ दाखवले. ज्यामध्ये एनसीबी कार्यालयात आरोपींना नेताना व्हिडिओ दाखवण्यातआले. त्यानंतर झोनल अधिकारी म्हणतात की, आम्ही ८ ते १० लोकांना अटक करण्यात आली असल्याचे दाखवले असल्याचे मलिक यांनी सांगितले.
 
क्रूझवरुन आर्यन खानला अटक करणारा एनसीबीचा अधिकारी केपी गोसावीचा एक सेल्फी फोटो व्हायरल झाला होता. यानंतर एएनआयने दिल्लीच्या एनसीबीने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितले की, हा एनसीबीचा अधिकारी नाही. तसेच या अधिकाऱ्याचा आणि एनसीबीचा काहीही संबंध नाही. मग ही व्यक्ती कोण असा सवाल उपस्थित होत आहे. जर तो व्यक्ती अधिकारी नाही तर आर्यन खानला कसा ओढून नेऊ शकतो? हे एनसीबीने स्पष्ट करावे असे मलिक यांनी म्हटलं आहे.
 
दुसरा आरोपी आरबाझ मर्चंटला एनसीबी मरुम शर्टमधील एनसीबी अधिकारी मनीष भानुशाली ओढत नेत आहे. हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसून तो भाजपचा नेता आहे. भानुशालीचे पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, फडणवीस, यांच्यासोबत फोटो आहेत. तर आशिष शेलार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी देखील फोटो काढले आहेत. याबाबतचेही स्पष्टीकरण एनसीबीला द्यावे लागेल असे मलिक यांनी म्हटलं आहे.