शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (10:25 IST)

भीषण रस्ता अपघातात तीन जणांचा मृत्यू

झारखंड मधील सरायकेला येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून हा अपघात खूप भीषण असल्याने यामध्ये दोन्ही वाहन क्षतिग्रस्त झालेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार सरायकेला राजनगर मुख्य रस्त्यावरील कालापठार गावाजवळ टिप टेलर आणि ALP 407 यांच्यात भीषण धडक झाली. धडक झाल्यानंतर टिप टेलरला आग लागली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 
 
तसेच  अपघातामुळे टीप टेलरने पेट घेतला यामुळे चालक जिवंत जळाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोन जण जखमी झाले. सध्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही.  

Edited By- Dhanashri Naik