गुरूवार, 29 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (10:32 IST)

मैनपुरीमध्ये ट्रक घरात घुसला,चौघांचा मृत्यू, 5 जखमी

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक मोठा रस्ता अपघात झाला. येथे लोखण्डी बार(सळ्या) भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या घरात घुसला. झोपेत असताना काळाने झडप घातली या अपघातात सेवानिवृत्त उपनिरीक्षक आणि त्यांच्या पत्नीसह चार जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले.
 
प्राथमिक माहितीनुसार ट्रकमध्ये बार भरले होते. मात्र अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरात घुसला. त्या घरात निवृत्त उपनिरीक्षक आणि त्यांची पत्नी उपस्थित होते. ही धडक इतकी जोरदार होती की पती-पत्नी दोघांचा जागीच मृत्यू झाला ही घटना घडली तेव्हा निवृत्त निरीक्षक आणि त्यांची पत्नी झोपले होते. त्याचवेळी ट्रकमध्ये एकूण सात जण होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.