गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 18 डिसेंबर 2022 (13:10 IST)

दोन बसची समोरासमोर धडक, तीन प्रवासी ठार, अनेक जखमी

accident
नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर रविवारी पहाटे दोन बसमध्ये भीषण टक्कर झाली. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
 
पोलिसांनी सांगितले की, नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर नॉलेज पार्कजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन बसची समोरासमोर टक्कर झाली. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात सुमारे 13 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. यानंतर माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
 
मध्य प्रदेशातील बस शिवपुरी येथून दिल्लीला जात होती आणि दुसरी बस प्रतापगडहून आनंद विहारकडे जात होती. या घटनेत तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींपैकी तीन जणांना ग्रेटर नोएडाच्या यथर्थ रुग्णालयात आणि 10 जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत सुरू आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
 
Edited by - Priya Dixit