सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (10:25 IST)

जम्मू काश्मीर मध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार

श्रीनगर.जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख फैयाजवार अशी झाली आहे.
 
 
काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, सोपोर चकमकी दरम्यान दहशतवादी संघटना एलईटीचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत.यापैकी एक फैयाज वार हा सुरक्षा दलांवर अनेक हल्ल्यांमध्ये सामील होता.
 
 
दरम्यान, पोलिसांनी कानाचक सेक्टरमध्ये पाकिस्तानातून येत असलेल्या ड्रोनचा ही गोळीबार करून नायनाट केला.त्यामधून स्फोटक साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
 
2 दहशतवाद्यांना अटक: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) नव्याने तयार झालेल्या लष्कर-ए-मुस्तफा (एलईएम) या दहशतवादी संघटनेच्या 2 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.