शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 ऑगस्ट 2018 (09:39 IST)

यूजीसीकडून ३५ विद्यापीठांच्या डिस्टन्स लर्निंगची मान्यता रद्द

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ३५ विद्यापीठांच्या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांची (डिस्टन्स लर्निंग) मान्यता रद्द केली.  या विद्यापीठांना स्पष्टीकरण देण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. या शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विचार केला जात आहे. कारण, या अभ्यासक्रमांचे संचलन गत पाच वर्षांपासून होत नाही. या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर होणार आहे. राज्यात  मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट आॅफ डिस्टन्ट अ‍ॅण्ड ओपन लर्निंग, शिवाजी विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महात्मा गांधी विद्यापीठातील दूरस्थ अभ्यासक्रम रद्द करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३८ अभ्यासक्रमांपैकी फक्त १७ अभ्यासक्रम कायम ठेवले आहेत.