शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जून 2018 (10:29 IST)

अन्नातून विषबाधा होत तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Unfortunate death
कोकणातील असलेला जिल्हा रायगड येथील  महाड या गावातील पुजेतील जेवणातून ५० ते ६० जणांना विषबाधा झाली आहे. मात्र  याच  घटनेत तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर विषबाधा झालेल्या  तर २५ जणांची प्रकृती गंभीर आहे.  पनवेलमध्ये या सर्व विषबाधा झालेल्या रुग्णांवर  रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  खालापूर तालुक्यातील महड गावात  माळी कुटुंबाच्या घरी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. यात  पुजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. मग  हा कार्यक्रम आटपून स्वगृही परतलेल्यांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला होता. यात जवळपास  ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे.