1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (13:19 IST)

Uttarakhand Rainfall:उत्तराखंडात ढगफुटी होऊन ,अनेक मृत्युमुखी ,रामगड परिसरात सात जणांचा मृत्यू

Uttarakhand Rainfall: Cloudburst in Uttarakhand
उत्तराखंडच्या डोंगराळ भागा पावसाने उच्छाद मांडलाआहे. कुमाऊंमध्ये पावसामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी नैनीताल जिल्ह्यातील रामगढमधील धारी तहसीलमधील दोषापानी आणि तिशापानी येथे ढगफुटी झाली. या दरम्यान कामगारांच्या झोपडीवरील संरक्षक भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली सात जण दबले गेले. ज्यातून हयात सिंह आणि त्याच्या आईचे मृतदेह सापडले. हयातसिंगची पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दुसरीकडे खैरणा येथील घरावर दरड कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 
 
दरड कोसळल्याने दोन मुले ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. ज्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्याच वेळी, अल्मोड्याच्या एनटीडी भागात, एका घरावर दरड कोसळल्याने त्यात अडकून चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाला. तर  पोलीस आणि एसडीआरएफच्या टीमने दोन लोकांची सुखरूप सुटका केली. बाजपूरमधील लेवाडा नदीला पूरआला. यामुळे मुख्य बाजारपेठ आणि घरात पाणी शिरले. सर्वत्र पाणी साचल्याने लोकांच्या घरांचे सामानही पूर्णपणे खराब झाले आहे. त्याचबरोबर बाजपूरमध्येही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
गरम पाण्यात मुसळधार पावसामुळे, महामार्गाच्या निर्माणाधीन कंपनीच्या दोन कामगारांची लोखंडी पत्रे अंगावर पडून दबल्यामुळे हसमुद (40) आणि इम्रान (34) भोजीपुरा बरेली यूपीचे रहिवासी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या अपघातात दोघांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
 
नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. कोसी नदीचे पाणी रामनगर-रानीखेत रस्त्यावर असलेल्या लेमन ट्री रिसॉर्टमध्ये शिरले होते. डीजीपी अशोक कुमार यांच्या मते, या रिसॉर्ट मध्ये सुमारे 100 लोक अडकले होते. ते सर्व सुरक्षित आहेत.