रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 जुलै 2017 (09:15 IST)

आठवड्यातून किमान एक दिवस वंदे मातरम म्हणा

मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'बाबत एक नवा आदेश दिला आहे. सर्व शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटींमध्ये आठवड्यातून किमान एक दिवस वंदे मातरम गायला हवं असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.  वंदे मातरम गाण्यास कुणाचा काही आक्षेप असेल तर त्यासाठी सक्ती केली जाणार नाही, पण त्यासाठी वैध कारण असायला हवं असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
 

सोमवारी किंवा शुक्रवारी वंदे मातरम गीत गायल्यास अजून उत्तम असंही न्यायालयाने म्हटलं आहे. याशिवाय सर्व सरकारी कार्यालय, संस्था, खासगी कंपन्या आदींमध्येही महिन्यातून एकदा वंदे मातरम गायला हवं असं न्यायालयाने म्हटलं आहे. 

यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर 2016 रोजी जन-गण-मन या राष्ट्रगीतासंबंधी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला होता. कोर्टाने देशभरातील सर्व सिनेमाघरांमध्ये राष्ट्रगीत वाजवणं तसंच पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवणं अनिवार्य केलं होतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला होता.