शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2017 (17:27 IST)

नायडू तब्बल नऊ वेळा विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावले

तब्बल नऊ वेळा केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू विमान दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे या सर्व दुर्घटना गेल्या 14 वर्षात घडल्या आहेत. बुधवारीदेखील असाच काहीसा प्रकार नायडूंसोबत घडला. व्यंकय्या नायडू आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना इंफाळ येथे घेऊन जाणा-या चार्टर्ड प्लेनमध्ये तांत्रिक दोष आढळून आले. यामुळे दोघांनाही इंफाळ दौ-याची योजना रद्द करावी लागली. व्यंकय्या आणि शहा मणिपूरचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी रवाना होत होते. मात्र विमानानं उड्डाण भरल्यानंतर 40 मिनिटांनंतर दोघंही पुन्हा दिल्लीत परतले. नायडू आणि विमान अपघाताचा हा  प्रवास 2003 पासून सुरू झाला आहे.