मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 एप्रिल 2018 (17:08 IST)

विष्णु सदाशिव कोकजे विश्व हिंदू परिषदचे नवे अध्यक्ष

हायकोर्टाचे माजी जज, हिमाचल प्रदेशचे माजी गव्हर्नर विष्णु सदाशिव कोकजे विश्व हिंदू परिषदचे नवे अध्यक्ष असणार आहेत. गुरुग्राममध्ये विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी मतदान झाले होते. त्यांना सर्वाधिक १३१ मतं मिळाली तर प्रवीण तोगडिया यांचे समर्थक राघव रेड्डी यांना 60 मतं मिळाली आहेत.

या आगोदर मतदार यादीत  प्रवीण तोगडिया यांनी गडबड झाल्याचा आरोप केला होता. वोटर लिस्टमध्ये 37 वोटर हे बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. वीएचपीचे महासचिव चंपत राय यांनी म्हटलं की, प्रवीण तोगडिया आणि व्हीएचपीचे अध्यक्ष राघव रेड्डी यांना अनेकदा मतदारांची यादी देण्यात आली होती.सूत्रांच्या माहितीनुसार राघव रेड्डी आणि प्रवीण तोगडिया गटाकडे कमी मतं होती त्यामुळे मागच्या वेळेप्रमाणे यंदाही गोंधळ घालून निवडणूक टाळण्याचा विचार होता. मात्र तोगडिया यांची सत्ता आता गेली  आहे.