मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (12:43 IST)

आमचा RSSच्या हिंदू धर्मावर विश्वास नाही- ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या अनेक महिने आधीच तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोपांचं युद्ध रंगलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता आरएसएसवरही टीका केली आहे.
 
आमचा आरएससच्या हिंदू धर्मावर विश्वास नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. कोचनेर येथे झालेल्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी म्हणाल्या, "आम्ही आरएसएसच्या हिंदू धर्मावर विश्वास ठेवत नाही आणि आम्ही कोणासमोरही झुकणार नाही."
 
त्यांच्या या विधानावर भाजपनेही प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुका भीती आणि दहशतीच्या वातावरणात होत असून इथं राष्ट्रपती राजवट लागू करावी. त्यानंतर निवडणूक घ्यावी असं मत भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी व्यक्त केलं आहे.