शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2016 (15:18 IST)

#webviral विदेशी मुली बनत आहे मुरत्या, दिल्लीत बनल्या सजावटी सामान

दिल्लीत असा ट्रेड सध्या जोरावर आहे ज्यात विदेशी मॉडल सजावटी सामान बनून खास इवेंट्सच्या शोभा वाढवत आहे. खास करून विदेशी मुलींना या कामासाठी घेण्यात येत आहे ज्यांना भारतीय मुलींच्या तुलनेत जास्त पैसे दिले जातात. दिल्लीत हा ट्रेड फार वाढला असून  इंटरनेटवर देखील खूप वायरल होत आहे.  
 
या मुली कधी शँपेन टेबल बनतात तर कधी जिवंत मुरत्या. यांना बर्‍याच वेळेपर्यंत एकाच पोझमध्ये उभे किंवा बसून राहावे लागते जसे निर्जीव वस्तूंकडून अपेक्षा केली जाते.   
 
कधी कधी नशेत धुंद लोकं यांना आश्चर्याने बघतात पण चांगले पैसे मिळवण्यासाठी ह्या सर्व काही सहन करण्यासाठी तयार असतात. काही मुलींनुसार अभ्यास पूर्ण न केल्याने चांगले पैसे मिळवण्यासाठी हा सर्वात चांगला मार्ग आहे.  
 
एका मुलीच्या कमरेवर एक प्लास्टिक डिक्स बांधण्यात आली आहे ज्यात कॉकटेल ग्लास अटॅच होते. त्यामुळे कधी कधी त्यांच्या त्वचेवर निशाण बनतात पण पैशासाठी हे सर्व काही सहन करत आहे.    
 
एक तास या प्रकारे उभे राहण्याचे या मुलींना 8,000 ते 20,000 रुपयांपर्यंत मिळू शकतात. दिल्ली, नोएडा आणि गुडगांवमध्ये या सजावटी मुलींचे चलन लग्नाच्या सजावटीसाठी करण्यात येते. मुंबई आणि बंगळुरामध्ये देखील आता याची झलक बघायला मिळत आहे.