मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 17 मार्च 2021 (09:00 IST)

अखेर दासगुप्ता यांचा राज्यसभेचा राजीनामा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 दरम्यान भाजपचा उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आलेल्या स्वपन दासगुप्ता यांनी राज्यसभेतून राजीनामा दिला आहे. अद्याप  त्यांच्या राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. 
 
तृणमूल काँग्रेसकडून दासगुप्ता यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी संविधानाच्या नियमांचा हवाला देत दासगुप्ता यांना ‘अपात्र' म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत.