रविवार, 21 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : बुधवार, 30 मार्च 2022 (16:11 IST)

चैत्रगौरी स्थापना 2022 Chaitra Gauri Pooja

चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेला चैत्रगौर बसविली जाते. या दिवशी देवघरातच किंवा आपल्या सोयीनुसार इतर पवित्र ठिकाणी गौरीची स्थापना केली जाते. यंदा 2022 साली 4 एप्रिल रोजी गौरी तृतीया आहे. याप्रमारे 4 एप्रिल 2022 सोमवारी देवीची स्थापना केली जाईल. 
 
तृतीया तिथी : चैत्र शुक्ल पक्ष तृतीया तिथि प्रारंभ 03 एप्रिल 2022, रविवार दुपारी 12:38 वाजेपासून
तिथि समाप्त 04 एप्रिल 2022, सोमवार दुपारी 01:54 वाजता
 
शिव-गौरी पूजन शुभ मुहूर्त : 
अमृत काल मुहूर्त : सकाळी 09:18 ते 11:02 पर्यंत
अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:36 ते दुपारी 12:26 पर्यंत
विजय मुहूर्त : दुपारी 02:06 ते 02:56 पर्यंत
गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 06:03 ते 0.27 पर्यंत
सांयकाळ मुहूर्त: संध्याकाळी 06.16 ते 07.25 पर्यंत
निशित मुहूर्त: रात्री 11.38 ते 12.24 पर्यंत
 
चैत्रगौरी स्थापना कशी करावी
शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपात पूजली जाते. गौरीची स्थापना करण्यापूर्वी घराच्या अंगणात चैत्रांगण काढावे. गौरी महिनाभर माहेरी येते म्हणून या दरम्यान दररोज अंगणात चैत्रांगण काढलं जातं. 
 
देवघरात देवीला स्वच्छ करुन पितळी पाळण्यामध्ये बसवावे.
महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया (अक्षय्य तृतीये) पर्यंत तिची पूजा करावी.
चैत्रगौरीपुढे शोभिवंत आरास मांडावी.
महिन्यातल्या कोणत्याही एका दिवशी सवाष्ण जेवू घालावी. डाळ-करंची, पन्हे असा बेत करावा.
महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावावं.
भिजविलेले हरभरे आणि फळे यांनी त्यांची ओटी भरतात.
त्यांना कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरबऱ्याची डाळ प्रसाद म्हणून द्यावी.
सवाष्णींना सुंगधी फुले द्यावी.
गौरीची आरती करावी. गौरीसाठी विशेष गाणी गायली पाहिजे.
 
चैत्रगौरी ही कर्नाटकातही मांडली जाते. देवीचे पूजन करून सुशोभन केले जाते. स्रियांची भिजवलेल्या हरभऱ्यांनी ओटी भरतात. तसेच राजस्थानात होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चैत्र महिना सुरू होतो आणि या दिवशी गणगौर बसवितात. होळीच्या राखेचे आणि शेणाचे 16 मुटके करतात. भिंतीवर 16 हळद आणि कुंकवाच्या टिकल्या काढतात. हे मुटके हे गौरीचे प्रतीक मानलं जातं. गव्हाच्या ओंब्या, हळद यांनी पूजा केली जाते. ज्वारीच्या कणसाला पांढरा दोरा बांधून गौरीच्या मुटक्यांजवळ ते कणीस ठेवले जातात ज्याला शंकर म्हणतात. आणखी एका कणसाला केसांचा गुंता आणि लाल पिवळा धागा बांधला जातो. हे देखील गौरीचे प्रतीक मानले जाते. या गौरीला चुरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचा नैवेद्य दाखवतात.