रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जून 2019 (13:42 IST)

Coolpad 3 plus कमी किंमतीत धमाल फीचर, कधी उपलब्ध होणार जाणून घ्या

स्मार्टफोन निर्माता कंपनी Coolpad ने स्वस्त दरांमध्ये नवीन स्मार्टफोन Coolpad 3 plus लॉन्च करण्याची घोषणा केली आहे आणि त्याची किंमत 6,499 रुपयांपर्यंत आहे. 
 
कंपनीने सांगितले की अँड्रॉइड पाई ऑपरेटिंग सिस्टम आधारित 5.7 इंच स्क्रीन असलेल्या या स्मार्टफोनमध्ये हेलीओ ए 22 क्वाडकोर 2.0 गीगाहर्ट्झ प्रोसेसर उपलब्ध आहे. यात 13MP रिअर आणि 8MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. यासह यात 3,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. कूलपॅड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फिशर युआनने या नवीन फोनला लॉन्च करताना सांगितले की याचे 2 मॉडेल काढले जात आहेत, ज्यात 2GB रॅम आणि 16GB रॉमची किंमत 5,999 रुपये आणि 3GB रॅम आणि 32GB रॉमची किंमत 6,499 रुपये आहे. ते म्हणाले की हा फोन ऑनलाइन मार्केटप्लेस अमेझॅनवर 2 जुलैपासून उपलब्ध होईल.