गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 27 जानेवारी 2018 (15:32 IST)

डिझाईन इन इंडिया' अंतर्गत लावाचा फोन बॅटरी बॅकअप 17 दिवस

'डिझाईन इन इंडिया'च्या अंतर्गत  भारतीय मोबाईल कंपनी लावा लवकरच बाजारात एक चांगला फोन आणणार आहे. यामध्ये 'डिझाईन इन इंडिया'च्या अंतर्गत लावा 'प्राईम एक्स' हा नवीन फोन बाजारात उतरवणार आहे. यात विशेष असे की फोनची बॅटरी बॅकअप 17 दिवस असणार आहे. तर त्यासोबत  दोन वर्षांच्या रिप्लेसमेंट वॉरंटीसह हा मोबाईल बाजरात दाखल होणार आहे. या फोनची किंमत 1499 रूपये असणार आहे. तर हा फोन ऑक्टोबर 2018 मध्ये हाउपलब्ध होईल. आकर्षक फीचर्स आणि स्वस्त किंमतीत भारतात बनवला जाणार्‍या या मोबाईलला विकत घेण्यासाठी ग्राहकांची उडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.