शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. मोबाईल
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (18:36 IST)

Moto G71 5G आज भारतात लॉन्च होईल!

मोटोरोला (Motorola) आज (10 जानेवारी 2022) भारतात आपला नवीन स्मार्टफोन Moto G71 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. हा फोन Moto G सीरीजचा तिसरा स्मार्टफोन असेल, कारण Moto G51 आणि Moto G31 सीरीज याआधी त्याचा एक भाग होता. या फोनची विक्री फ्लिपकार्टकडून केली जाणार आहे. मोटोरोलाने ट्विटरच्या माध्यमातून फोन लॉन्च करण्याबाबत सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Moto G71 5G मध्ये 6.7-इंचाचा AMOLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच हा फोन स्नॅपड्रॅगन TM 695 5G प्रोसेसर, 13 ग्लोबल 5G बँड यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो.
 
याशिवाय फोनबाबत अनेक बातम्याही समोर आल्या आहेत. चला जाणून घेऊया फोन कोणत्या फीचर्ससह येऊ शकतो आणि किंमत काय असू शकते…
 
फीचर्स बद्दल, अशी अपेक्षा आहे की ते ग्लोबल मॉडेल सारखे असतील, म्हणजे त्यात AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हे काही महिन्यांपूर्वी लॉन्च झालेल्या Moto G31 सारखेच असू शकते.
 
50 मेगापिक्सेल कॅमेरा मिळू शकतो
कॅमेरा म्हणून, या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा,  8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी म्हणून फोनमध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
 
पॉवरसाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 30W फास्ट वायर्ड चार्जिंगसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth v5.0, GPS / A-GPS, USB टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे.
 
किंमत देखील लीक झाली…
टिपस्टर अभिषेक यादवने Motorola Moto G71 5G ची भारतीय किंमत लीक केली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, Moto G71 भारतात 18,999 रुपयांना लॉन्च केला जाईल. मात्र फोनच्या रॅम आणि कलर ऑप्शन्सबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.