शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2017 (11:13 IST)

‘Nokia 3’चे स्मार्टफोन पुढच्या आठवड्यात लाँच होणार

मोबाईल हँडसेट क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी नोकिया बाजारपेठेत नव्या रुपात दाखल होणार आहे.
 
‘नोकिया ३’, ‘नोकिया ५’ आणि ‘नोकिया ६’ हे तीन अँड्रॉईड फोन १३ जून रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहेत.
 
नोकियाचे स्मार्टफोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने लाँचिंगची तारीख निश्चित केली आहे.
 
त्यामुळे ज्या फोनच्या पुनरागमनाची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या कंपनीचे स्मार्टफोन पुढच्या आठवड्यात बाजारपेठेत दाखल होणार आहेत.
 
फेब्रुवारी महिन्यात बार्सिलोना येथे झालेल्या ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये नोकियाने पुनरागमनाची घोषणा केली होती.
 
त्यानुसार ‘नोकिया ३’, ‘नोकिया ५’ आणि ‘नोकिया ६’ हे स्मार्टफोन पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहेत. हे फोन भारतात जरी उशिरा लाँच झाले असले, तरी अनेक देशांत एप्रिल महिन्यांतच हे फोन विक्रीसाठी उपलब्ध झालेत.