शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

अमरनाथ यात्रेला निघालात, ही आहे जीयोची तुमच्या साठी बंपर ऑफर

रिलायन्स जिओने अमरनाथ यात्रेकरुंसाठी विशेष  प्लॅन लाँच केला ऑन,  जम्मू-काश्मीरमध्ये 102 रुपयांचा प्रीपेड प्लॅन उपलब्ध होत आहे.  या प्लॅनमध्ये जिओ ग्राहकांना अनलिमिटेल व्हॉईस कॉलसह मेसेज आणि इंटरनेट डाटाही उपलब्ध करवून दिला आहे. रिलायन्स जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 7 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि 500 एमबी हाय-स्पीड इंटरनेट डाटा मिळणार आहे. डाटा संपल्यानंतर त्यापुढील इंटरनेट वापराला 64 केबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. 
 
- जम्मू-काश्मीरमध्ये येणारे जिओचे प्रीपेड सब्सक्रायबर्स नवे लोकल कनेक्शन खरेदी करतील 
 
-  जिओने 102 रुपयांचा हा प्लॅन जम्मू-काश्मीरमधील अनेक रिटेलर्सच्या मदतीने उपलब्ध केला  
 
-  प्लॅन अमरनाथ यात्रेच्या पूर्ण काळात उपलब्ध असेल.
 
- आणखी एक 98 रुपयांचा प्लॅन वैधता (व्हॅलिडिटी) 28 दिवसांची 
 
- ग्राहकांना 2GB डाटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 300 एसएमएसची सुविधा