शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By भाषा|
Last Modified: बी‍जिंग , गुरूवार, 7 ऑगस्ट 2008 (19:19 IST)

ऑलिम्पिक सोहळ्यासाठी सोनिया बीजिंगमध्ये

कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधींच्या तीन दिवसीय चीन दौर्‍यास सुरूवात झाली असून ऑलिम्पिक शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती राहण्यासोबतच त्या चिनी नेत्यांशी द्विपक्षीय संबंधावर चर्चाही करतील.

सोनियांचे राहुल, प्रियांका, जावई रॉबर्ट वढेरा व नातवंडासहित आज येथे आगमन झाले. वर्षभरातील त्यांची ही दुसरी चीन भेट असून परराष्ट्र राज्यमंत्री आनंद शर्माही त्यांच्यासोबत आहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष ह्यु जिंताओ यांचा राजकीय वारसदार व उपराष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग यांच्याशी त्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील. पक्षापक्षातील संबंध वाढवण्याबाबतही विचारविनिमय होईल.

बीजिंगमध्ये बर्ड नेस्ट मैदानात उद्याच्या ऑलिम्पिक शुभारंभ सोहळ्यास त्या उपस्थिती दर्शवतील. शुभारंभास जगभरातील सुमारे ऐंशी देशांचे प्रमुख उपस्थित राहतील.