Last Modified: बिजींग, , सोमवार, 11 ऑगस्ट 2008 (10:06 IST)
निशानेबाजी आणि तिरंदाजीत निराशा
श्रीधर आणि सायना चमकले
भारतासाठी बिजींग ऑलम्पिकमध्ये भारताला अदयापही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. पदकाची मोठी अपेक्षा असलेल्या महिला तीरंदाजी संघाचा निशाणा पुन्हा चुकला. अनेक नामांकित निशाणेबाजांनी सलग दूस-या दिवशीही निराशा केली. संपूर्ण दिवसभरात बॅडमिंटन खेळाडू अनूप श्रीधर आणि सायना नेहवाल याच्या रुपानेच भारतीय संघाला काय ते थोडेफार यश चाखता आले.
श्रीधरने बॅडमिंटनच्या एकेरी सामन्यात विजयी सुरुवात करत पुर्तगालच्या मार्को वॉस्कोसेलोसचा सलग सामन्यात 21-16 21-14 ने पराभव केला. तर बॅडमिंटनपटू सायनाने आपला उत्कृष्ट खेळ करीत यूक्रेनच्या लारेसा जराइगा हिचा पराभव करीत उपउपांत्य सामन्यात स्थान मिळविले आहे. सायनाने तिच्या युक्रेनी प्रतिस्पर्धीस 21-18, 21-10 ने मात दिली.
सायनाचा पुढचा सामना जागतिक क्रमवारीत तिस-या क्रमांकावर असलेल्या हॉंगकॉंगची चेन वॉंग अणि स्लोवाकियाची इवा स्लादेकोवा यांच्यात होणा-या सामन्यातून विजयी स्पर्धेकाशी होणार आहे.