शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|
Last Modified: बीजिंग , शनिवार, 9 ऑगस्ट 2008 (12:55 IST)

पहिले सुवर्णपदक चेक प्रजासत्ताकाला

बीजिंग ऑलिपिंकमधील पहिले सुवर्णपदक चेक प्रजासत्ताकाच्या कैटरीना एमन्स हिने पटकावले. एमन्सने शनिवारी महिलांच्या दहा मीटर पिस्तोल नेमबाजीत हे यश मिळविले. २००४ मध्ये अथेन्स ऑलिंपिकमध्ये तिने कास्य पदक मिळविले होते.

या स्पर्धेत चीनला मात्र निराशा पत्करावी लागली. त्यांची टू ली ही खेळाडू पाचव्या क्रमांकावर राहिली. तिनेच अथेन्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. रशियाची लिऊबोव गलकिना हिने रौप्यपदक मिळवले. गेल्या लिंपिकमध्येही तिने रौप्यपदकच पटकावले होते. क्रोएशियाची स्नजेजना पेजसिसने कास्यपदक मिळविले.