अंजलीचा पदकावरचा 'नेम' चुकला
बिजींग- संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागून असलेल्या अंजली भागवतने नेमबाजीत भारताला पदापर्णातच अपयशाची चव चाखली असून 10 मी.एअर रायफल प्रकारातून ती स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतच बाद ठरली आहे. यामुळे तिच्याकडून असलेल्या अपेक्षा धुळीला मिळाल्या असून भारतीय मनोबलाला पहिलाच धक्का बसला आहे.मूळची महाराष्ट्राची असलेली अंजली भगवत व पंजाबची अवनीत कौर या दोघीही एअर रायफल प्रकारातील स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतच बाद झाल्या. आता नेमबाजीतील इतर प्रकारात तिच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.