Last Modified: बिजींग, , शुक्रवार, 8 ऑगस्ट 2008 (13:17 IST)
ऑलम्पिक स्टेडीयम उडविण्याची धमकी
बिजींगमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था
बिजींग- ऑलम्पिकच्या काळात बिजींगमध्ये मोठया प्रमाणावर दहशतवादी कारवाया घडवून आणण्याची धमकी तुर्कीस्तान इस्लामिक पार्टीने दिली आहे. या संदर्भात या संघटनेने एक व्हीडीओ फित प्रदर्शित केली आहे. चीन सरकारने ही धमकी अतिशय गंभीरतेने घेतली असून बिजींगमध्ये कडेकोड सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
तुर्कीस्थान इस्लामिक पार्टी नावाच्या या संघटनेने बिजींग ऑलम्पिक काळात मोठी दहशतवादी कारवाई करणार असल्याचे सांगत एक व्हीडीओ चित्रफित जाहीर केली आहे. उर्दुत असलेली या चित्रफितीतून दहशतवादी कारवाईची धमकी देण्याबराबरच ऑलम्पिक काळात मुस्लिम धर्मियांनी रेल्वे, विमान व बससेवेचा वापर न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
तुर्किस्तान इस्लामिक पार्टी ही चीनच्या जिनजियांग या प्रांताचया स्वायत्ततेसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून लढा देत आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर बिजींगमध्ये कडेकाट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.