शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|

ऑलिंपिक तिकिटाच्या नावावर फसवणूक

बिजींग ऑलिंपिक एक भव्य- दिव्य अनुभव असल्याने चीनमध्ये प्रत्यक्षात जाऊन हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त करत एका संकेत स्थळाच्या माध्यमातून बिजींग ऑलिंपिक खेळाचे तिकिट नोंदवले होते.

आता हे संकेतस्थळच खोटे असल्याचे उघड झाल्याने आता या साऱ्या क्रीडा प्रेमींचे धाबे दणाणले आहेत. उद्यापासून ऑलिंपिक स्पर्धांना सुरुवात होत आहे

काही जण तर यासाठी बिजींगमध्येही दाखल झाले आहेत. परंतु आता त्यांना त्यांची तिकिटे खोटी असल्याचे कळल्याने नेमके काय करावे हेच त्यांना सुचत नाही.

या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, ब्रिटेन, आणि अशा अनेक देशांतील क्रीडा प्रेमींनी तिकिटांची नोंदणी केली होती.

उद्घाटन समारोहासाठी 1750 आणि 2150 अमेरिकी डॉलरचे तिकीट या फसवल्या गेलेल्या प्रेक्षकांनी विकत घेतले होते. ऑलिंपिक समितीने या वृत्ताला दुजोरा दिला असून प्रेक्षकांनी अधिकृता जागेवरून तिकिट खरेदी करावे असे आवाहन समितीने केले आहे.