शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|

ऑलिंपिकमध्ये ‍चीनचा पहिला विजय

चिनने ऑलिंपिकचे यजमान पद मिळवल्यानंतरच आपले विजयाचे मनसुबे जगापुढे मांडले होते. यानंतर चीनने सर्वात मोठा संघ जाहीर करून भल्या भल्यांच्या मनात धडकी भरली आता, आज झालेल्या ऑलिंपिकमधील पहिल्या महिला फुटबॉल सामन्यात चीनने स्वीडनचा 2-1 ने पराभव करत आपल्या विजयी घोडदौडीस प्रारंभ केला आहे.

तियानजीन येथील खचाखच भरलेल्या फुटबॉल स्टेडियमवर चीनच्या समर्थकांनी आसमंत डोक्यावर गेला होता. चीनच्या विजयांच्या घोषणांनी आकाश निनादून गेले होते.

खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या सहाव्या मिनिटालाच चीनच्या जू युवान ने पहिला गोल करत चीनला बढत मिळवून दिली. यानंतर चीनच्या खेळाडूंनी सातत्याने आक्रमक खेळ करत स्वीडन संघाची दमछाक केली.

ग्रुप इ च्या पहिल्या सामन्यात चीनने बढत मिळवली आहे. दुसरीकडे कॅनडानेही अर्जेंटीनाचा 2-1 ने पराभव केला.

शेनयांगमध्ये खेळल्या गेलेल्या ग्रुप एफच्या सामन्यात उत्तर कोरियाने नायजेरियाचा पराभव करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. हा सामना 2-2 ने टाय झाला.

नॉर्वेने मात्र अमेरिकेचा 2-0 असा पराभव करत अमेरिकेला जोरदार धक्का दिला.