शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. ऑलिंपिक बातम्या
Written By वार्ता|
Last Modified: बीजिंग , सोमवार, 11 ऑगस्ट 2008 (15:20 IST)

चीन अमेरिकेचा सापशिडीचा खेळ

ऑलिंपिक उद्घाटनाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा केल्यानंतर चीनने आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिकेपुढे आपले घातक मनसुबे मांडले होतेच.

जागतिक महासत्ता बनण्याच्या तयारीत असलेल्या चीनला आपल्या यजमानपदाच्या कारकीर्दीत ऑलिंपिकमध्ये बहुतांश पदक मिळवण्याची मनीषा आहे.

आता अमेरिका आणि चीनमध्ये या पदकांसाठी चांगलीच स्पर्धा सुरू झाली असून, ऑलिंपिकच्या दुसऱ्या दिवशी चीन पदक तालिकेत सर्वाधिक चार सुवर्ण पदकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दोन सुवर्ण पदके मिळवत अमेरिका चीनचा पाठलाग करत आहे.

आता या दोनही देशांत पदकांची भूक शमवण्याची स्पर्धा सुरू झाली असून, सध्यातरी त्यांच्यात पदकासाठी चढाओढ सुरू झाली आहे.