1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 16 जुलै 2025 (10:56 IST)

पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 16 हरणांचा मृत्यू

deer
पुण्यातील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 16 हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांत 16 हरणांचा मृत्यू झाला असून या मध्ये मादी हरणांची संख्या जास्त आहे. हरणांचा मृत्यू कशा मुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. 
प्राथमिक अंदाज हरणांचा मृत्यू साथीच्या आजारामुळे झाल्याचे समोर आले आहे. मृत हरणांचा व्हिसेरा परीक्षणासाठी नागपूर येथील वन्यजीव प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.   न्याय वैद्यकीय परीक्षणाच्या अहवालांनंतर मृत्यूचे कारण कळू शकेल.अचानकपणे इतक्या मोठ्या संख्येने हरणे दगावल्याने प्राणी संग्रहालय प्रशासनदेखील दक्ष झाले आहे. 
या प्राणी संग्रहालयामध्ये 100 हुन अधिक हरणे आहे. गेल्या आठवड्यापासून एक दोन हरणांचा मृत्यू होत आहे. आता पर्यंत 16 हरणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित हरणांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामध्ये हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापैकी काही हरणे लवकरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहेत. 
प्राणी संग्रहालय प्रशासनाने मादी आणि नर हरणांना वेगवेगळ्या पिंजऱ्यांत ठेवले आहे. यापैकी साथीच्या आजारामुळे मादी हरणांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
Edited By - Priya Dixit