मंगळवार, 17 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 17 जुलै 2024 (19:35 IST)

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या विरोधात एसीबीला प्राथमिक तपासात पुरावे सापडले

ओबीसी एनसीएल आणि अपंगत्व प्रमाणपत्र प्रकरणावरून महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे.त्यांच्या आईच्या विरोधात पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकी देण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर हे देखील वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. एसीबीला प्राथमिक तपासात त्यांच्या विरोधात पुरावे सापडले आहे. त्यांनी सेवे दरम्यान बेहिशोबी मालमत्ता मिळवण्याचे पुरावे मिळाले आहे.त्यांनी  2020 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संचालक पदावरून निवृत्ती घेतली आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो मधील सर्वोच्च सूत्रांनी सांगितले की,दिलीप खेडकर यांच्या विरोधात एसीबीच्या प्राथमिक तपासात ही बाब समोर आली आहे. आता एसीबी दिलीप खेडकर यांना त्यांच्या उत्पन्नाचा आणि मालमत्तेच्या हिशोबचा तपशील देण्यासाठी नोटीस पाठवू शकते.दिलीप खेडकर यांच्याकडे मुंबई, पुणे, अहमदनगर, पुणे ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता आहे. त्यांनी सविस्तर अहवाल दिल्यावर त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवू असे एसीबीच्या वरिष्ठ सूत्राने सांगितले.   

पूजा खेडकरची नोकरी, क्रिमी लेअर प्रमाणपत्र, आणि संशयास्पद अपंगत्व प्रमाणपत्राचे मुद्दे समोर येण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगी नंतर चौकशी सुरु करण्यात आली.

एसीबी पुणे आणि एसीबी नाशिकच्या अधिकाऱ्यांनी दिलेला प्राथमिक अहवाल पुढील कारवाईसाठी एसीबी मुख्यालयाकडे पाठवला आहे. 

पूजा खेडकर कागदपत्रे वाद प्रकरणांनंतर तिचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करण्यात आला असून तिला लालबहादूर शास्त्री नॅशनल ऍडमिनिस्ट्रेशन अकादमी मसुरी ने तात्काळ बोलावण्यासाठीचे पत्र जारी केले असून महाराष्ट्र सरकारला देखील कळवण्यात आले आहे. त्या सध्या वाशीम जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे.   
 
Edited by - Priya Dixit