रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (15:30 IST)

पुण्यात अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून

murder
पुण्यातील कात्रज भागात एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोपीनाथ बाळू इंगुळकर असे मयताचे नाव आहे. या महिलेचे एका पुरुषाशी अनैतिक संबंध होते. महिलेचा पती त्यांच्यातील अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता. म्हणून पत्नी ने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला.नंतर आरोपींनी आत्महत्येचा बनाव रचला.

पोलिसांनी तपास केल्यावर महिलेने खून केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मयत गोपीनाथ हे मार्केट यार्डात हमालीचे काम करायचे त्यांची पत्नी एका वसतिगृहात सफाईचे काम करते.त्यांना एक दहा वर्षाची मुलगी आहे.तिच्या समोर दोघांनी पतीचा खून केला आणि कोणालाही काही न सांगण्याची धमकी दिली. 

महिलेचे त्यांच्या नात्यातील एका पुरुषाशी अनैतिक संबंध होते. महिलेचा पती 22 सप्टेंबर रविवारी रोजी झोपलेला असता त्याच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने गोपीनाथ यांचा गळा आवळून खून केला. नंतर पत्नीने आत्महत्याचा बनाव रचला आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. भारतीय विद्यापीठ पोलिसांनी प्रकरणाची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली.

मयत गोपीनाथचे शवविच्छेदनाच्या अहवालात गोपीनाथचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी तपास केल्यावर महिलेने अनैतिक संबंधात अडथळे येत असल्यामुळे गोपीनाथचा खून केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी महिला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 
Edited by - Priya Dixit