शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (08:14 IST)

पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णालयातील शवगृह बंद, मृतदेह ठेवायचे कुठे? मोठा प्रश्न

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयामधील डेड हाऊस गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नातेवाईकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. 
 
दररोज सुमारे 20 ते 25 रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच इतर आजारांच्या रुग्णांचा, अपघात झालेल्यांचाही मृत्यू होत आहे. दूरच्या नातेवाईकांना मृतदेह लगेच नेणे शक्‍य होत नाही. तसेच नॉन कोविड रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे शवविच्छेदन करावे लागते. त्यामुळे मृतदेह शवागृहात ठेवण्याची वेळ येते. 
 
या ठिकाणी शवागृहातील कॉम्पेसर बंद पडले आहे. त्यामुळे गेल्या 22 दिवसांपासून शवागृह बंद आहे.तिथे मृतदेह ठेवण्यासाठी नकार दिला जातो. प्रशासनाने देखावा म्हणून त्याठिकाणी बर्फाच्या लाद्या ठेवल्या आहेत. मात्र त्यामध्येही मृतदेह ठेवला जात नाही. त्यामुळे नातेवाईकांना निम्म्या रात्री अंत्यविधी करण्यासाठी न्यावे लागते किंवा मृतदेह तसाच ठेवावा लागतो.