गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (08:20 IST)

पुण्यात 1 हजार 165 कोरोना रुग्णांची वाढ तर 4 हजार 10 रुग्णांना डिस्चार्ज

Increase of 1 thousand 165 corona patients
पुण्यात सोमवारी दिवसभरात 1 हजार 165 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 4 हजार 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
पुणे महापालिका हद्दीत नव्याने 51 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7 हजार 409 इतकी झाली असून पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 30 हजार 836 रुग्णांपैकी 1402 रुग्ण गंभीर तर 6236 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
 
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 47 हजार 729  इतकी झाली आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 9 हजार 484 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज दिवसभरात 11499 इतके आतापर्यंत एकूण 22 लाख 87 हजार 587 जणांचे स्वॅब टेस्टसाठीचे नमुने घेण्यात आले.
 
तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.