रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (08:08 IST)

मुंबईतील पोलीस स्टेशनमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; ” पोलीस कर्मचारी जखमी

मुंबई : शहरातील खेरवाडी पोलीस स्टेशनच्या स्टोअर्स रूममध्ये ठेवलेल्या सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटामध्ये 2 पोलीस कर्मचारी गंभीरीरित्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
 
अधिक माहितीनुसार, वांद्रे पूर्व सरकारी वसाहत या ठिकाणी खेरवाडी पोलीस स्टेशन आहे. पोलिसांकडून अवैधरित्या उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई केली जाते. अशाच एका खाद्यपदार्थ गाड्यावर कारवाई केल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या वस्तूपैंकी एक सिलेंडर खेरवाडी पोलीस स्टेशनमधील स्टोअर्स रूममध्ये ठेवण्यात आले होते. याच सिलेंडरचा आज दुपारी अचानक स्फोट झाला.
 
सिलेंडरच्या स्फोटावेळी पोलीस स्टेशनमध्ये असलेले 2 पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. या कर्मचाऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी परिस्थिती नियंत्रण आणली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor