शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2022 (14:50 IST)

पुणे :स्कूल बस चालकाचा 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

rape
पुण्यात एका स्कूल बस चालकाने 15 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बस चालकानी या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि तिला वेग-वेगळया ठिकाणी घेऊन जाऊन  तिच्याशी लैंगिक संबंध बनवले. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. बस चालकावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर घुले पाटील(35 रा. वडाची वाडी उंडरी )असे या आरोपीचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन असून कोंढवातील एका नामांकित शाळेत शिकते. ती दररोज स्कूल बस ने शाळेत ये जा करत असे. पीडित मुलीची ओळख या बस चालकाशी झाली. मुलगी अल्पवयीन असून देखील चालकाने तिला माझ्याशी रिलेशनशिप मध्ये राहणार का असं विचारलं. तिला रिलेशनशिप मध्ये राहणं ,हणजे काय हे माहित नसून मुलीने होकार दिला. नंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला तिच्या दोन मैत्रिणीच्या घरी आणि पिसोळी परिसरातिल अर्धवट बांधकाम झालेल्या एका इमारतीत घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला.नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्यावर आरोपी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.